वोडका विथ आंबा पन्हं
आंब्याच पन्हंं एक क्लासिक ड्रिंक आहे पण यात वोडका मिसळला तर हा वेगळाच स्वाद देईल. जर तुम्ही वोडका पित असाल तर तुम्ही हे आंब्याच पन्हं जरूर ट्राय करा.
साहित्य - वोडका - 60 एम एल, हिरवा आंबा - 1, पाणी - 200 एम एल, जिरे पूड - 1 चमचा, मीठ - 1 चमचा, साखर - 3 चमचे.
विधी - एका पातेल्यात पाणी आणि आंबा घालून चांगले उकळून घ्यावे. मग पाणी गाळून आंब्याला सोलून त्यातील गर वेगळा काढून द्या. आता गराला एका भांड्यात काढून घ्या. मग यात पाणी, साखर, मीठ आणि जिरेपूड घालून मिक्स करा. या मिश्रणाला चांगल्या प्रकारे फेटून घ्या. आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्या. मग याला एका ग्लासमध्ये घालून वरून थोडासा वोडका मिक्स करा. यावर आईस क्यूब्स घालून सर्व्ह करा.