बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

स्वीट कॉर्न सूप

साहित्य - १ गाजर, ८-१0 फरसबी च्या शेंगा, १ सिमला मिरची, १ वाटी स्वीट कॉर्नचे दाणे, २ टे. स्पू. कॉर्नफ्लोर पावडर, १ टे. स्पू. सोयासॉस, १ टे. स्पू. व्हाईट व्हिनेगर, चिली सॉस, १ टी स्पू. साखर, मीठ आणि १ कप दूध.

कृती - सर्व भाज्या बारीक, चिरून घ्याव्यात. नंतर ४-५ वाटी पाणी घालून मऊसर शिजवून घ्याव्या. स्वीट कॉर्नचे दाणे वेगळे करून वाफवून घ्यावे. शिजवलेल्या भाज्या घोटून मोठय़ा गाळण्यातून गाळून घ्याव्या. भाज्यांचं गाळलेलं पाणी, मक्याचे दाणे एकत्र करावे. दुधात कॉर्नफ्लोअर पावडर कालवून त्यात टाकावी. मीठ, साखर, सोयासॉस, चिलीसॉस, व्हिनेगर टाकून सूप जरा वेळ उकळून घ्यावं. आणि गरमागरम सूप सर्व्ह करावं.