Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले
दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे माहीत असूनही जगभरातील बरेच लोक दारू पितात आणि पार्ट्यांमध्ये आनंदाने इतरांना सर्व्ह करतात. मद्यप्रेमींनी विविध प्रकारच्या मद्यासाठी हंगामही निश्चित केला आहे. जसे हिवाळ्यात रम आणि वाईन तर उन्हाळ्यात बिअर.
पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की बिअर पिणारे नेहमीच थंडगार बिअरला प्राधान्य का देतात. कारण बिअर जसजशी गरम होते तसतशी तिची चव कडू होऊ लागते. पण असे का घडते? नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनात ही बाब समोर आली आहे.
मॅटर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की बिअर जितकी थंड असेल तितकी तिची चव चांगली असेल. दारुला वैज्ञानिकदृष्ट्या अल्कोहोल म्हणतात, जर आपण थोडे अधिक वैज्ञानिक असतो तर त्याला इथेनॉल म्हणतात. आता प्रत्येक प्रकारच्या दारूमध्ये इथेनॉलचे प्रमाण बदलते. संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अल्कोहोलमध्ये असलेले पाणी आणि इथेनॉलच्या मॉलिक्यूल्सच्या बिहेवियरचे निरीक्षण केले आणि असे आढळले की हे मॉलिक्यूल्स वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळे आकार घेतात.
शास्त्रज्ञ काय म्हणाले?
प्रोफेसर ले जियांग, जे या संशोधन टीमचा भाग होते, त्यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द टेलिग्राफला सांगितले की, "विविध प्रकारच्या अल्कोहोलमध्ये पाणी आणि अल्कोहोलचे मॉलिक्यूल्स वेगवेगळे आकार घेतात. ज्या पेयांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, जसे की बिअरमध्ये मॉलिक्यूल्स पिरॅमिडचा आकार घेतात आणि जेव्हा तापमान कमी होते तेव्हा मॉलिक्यूल्स घट्ट होतात, म्हणूनच थंड बिअरची चव चांगली असते. ते म्हणाले की कोल्ड बीअरची चव अधिक फ्रेश जाणवते, तर त्या तुलनेत जास्त अल्कोहोल असलेल्या दारूची चव कडू असते.
याआधी, बिअरवर केलेल्या आणखी एका संशोधनात, हवामान बदलाचा बिअरवरही परिणाम होत असल्याचे समोर आले होते. नेचर कम्युनिकेशन्स या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे बिअरच्या किमती वाढतील आणि तिची चवही बदलेल.
वाढणारे जागतिक तापमान आणि इतर कारणांमुळे बिअर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॉप फुलांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते, ज्यामुळे बिअरची किंमत आणि चव दोन्ही बदलू शकतात.