शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (15:14 IST)

आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरला जाणार्‍यांची भक्तांची ओढ दिसून येते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येतात. यावर्षी आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे रेल्वेने विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आषाढी एकादशीला मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या सुटणार आहेत.
 
 
पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेने स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. त्या 5 ते 14 जुलैदरम्यान चालवण्यात येणार आहेत. या ट्रेन नागपूर सोलापूर- लातूर – अमरावती – मिरज – खामगाव ते पंढरपूर, मिरज- कुडूवाडी दरम्यान चालवल्या जातील. जादा फेऱ्या सोडल्या आहेत. त्यांचं आरक्षण सुरू झालं आहे.
 
गाड्यांचं वेळापत्रक
ट्रेन क्र. 01109/10 : लातूर- पंढरपूर (12 फेऱ्या)
मिरज – कुर्डुवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष (20 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01112/13 डेमू विशेष : पंढरपूर – मिरज विशेष (8 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01115/16 नागपूर- मिरज विशेष (फेऱ्या)
ट्रेन क्र. 01117/18 : नागपूर – पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01119/20 : अमरावती- पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01121 /22 : खामगाव – पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)