Dharma Sangrah
✕

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

Updated: शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 (15:47 IST)
साबुदाणा आणि रताळ्याचे झटपट थालीपीठ
साहित्य-
भिजवलेला साबुदाणा: १ कप
उकडलेले व किसलेले रताळे: १/२ कप
राजगिरा किंवा शिंगाडा पीठ: २ चमचे (बाइंडिंगसाठी)
भाजलेला शेंगदाणा कूट: ३ चमचे
बारीक चिरलेली हिरवी मिरची: २
सेंधव मीठ: चवीनुसार

कृती-
एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून हाताने छान मळून घ्या (रताळ्यामुळे थालीपीठ मऊ आणि चवदार होते). थालीपीठ थापून गरम तव्यावर मंद/मध्यम आचेवर तूप लावून खरपूस भाजून घ्या.

राजगिरा आणि काकडीचे हलके थालीपीठ
साहित्य-
राजगिरा पीठ: १ कप
किसलेली काकडी: १/२ कप (पाणी न पिळता)
शेंगदाणा कूट: २ ते ३ चमचे
हिरवी मिरची पेस्ट: १ चमचा
सेंधव मीठ: चवीनुसार

कृती-
राजगिरा पीठात किसलेली काकडी, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट आणि मीठ घाला. काकडीच्या पाण्यामध्येच पीठ मळून घ्या (जास्तीचे पाणी घालू नका). हे थालीपीठ थेट तव्यावर तूप लावून किंवा बटर पेपरवर थापून दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्या.

भगर आणि साबुदाण्याचे पारंपरिक थालीपीठ
साहित्य-
भगर (वरई) पीठ: १ कप
शाबुदाणा पीठ: १/२ कप (किंवा २ तास भिजवलेला शाबुदाणा)
उकडलेला बटाटा: १ (मॅश केलेला)
भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट: ३ ते ४ चमचे
हिरवी मिरची पेस्ट: १ चमचा
जिरे: १ चमचा
सेंधव मीठ: चवीनुसार
तूप/तेल: शेकण्यासाठी
ALSO READ: कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय
कृती-
एका परातीत भगर पीठ, साबुदाणा पीठ, मॅश केलेला बटाटा, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, जिरे आणि सेंधव मीठ एकत्र करा. बटाट्याच्या ओलाव्यामध्येच पीठ मळा. आवश्यकतेनुसार थोडे कोमट पाणी घालून मऊ गोळा तयार करा. प्लास्टिक पेपर किंवा सुती कापड ओले करून त्यावर पिठाचा गोळा ठेवून हाताने पातळ थालीपीठ थापा. मध्यभागी एक छोटे छिद्र करा. तव्यावर तूप लावून मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
ALSO READ: स्वादिष्ट राजगिरा उपमा, आरोग्यासाठी फायदेशीर आणि बनवायला सोपा
महत्त्वाच्या टिप्स: पीठात उकडलेला बटाटा, रताळे किंवा किसलेली काकडी वापरल्याने थालीपीठ मऊ राहते आणि तुटत नाही. हे थालीपीठ उपवासाची घट्ट दही, शेंगदाण्याची आमटी किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत गरम-गरम खाण्यास अत्यंत चवदार लागते.
ALSO READ: नवरात्री स्पेशल फराळ थाळी: एकाच वेळी बनवा ४ चविष्ट उपवासाचे पदार्थ

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

आता, भेंडी अनेक दिवस ताजी राहील; फक्त ही सोपी युक्ती करा

Ragi Vegetable Momos मैदा-मुक्त, पौष्टिक असे ''नाचणी व्हेजिटेबल मोमोज''

महिलांमध्ये लोहाची कमतरता होण्याची कारणे कोणती? आहारात काय समाविष्ट करावे?

दिवाळी अंकांची परंपरा आजही का टिकून आहे? मराठी वाचन संस्कृतीसमोरील नवी आव्हाने

World Mental Health Day 2026: जागतिक मानसिक आरोग्य दिन

पुढील लेख
Show comments