शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (16:12 IST)

FIFA WC 2022: फिफा विश्वचषकात आता फक्त आठ संघ भाग घेणार, जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत कोणाचा सामना होणार?

FIFA विश्वचषक 2022 मधील शेवटचे 16 सामने संपले आहेत. आता या स्पर्धेत फक्त आठ संघ उरले आहेत. आता विजयी संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचबरोबर या स्पर्धेत पराभूत चार संघांचा प्रवास संपणार आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अंतिम 16 मधील शेवटचा सामना पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड यांच्यात होता. या सामन्यात पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा 6-1 अशा फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यासोबतच अंतिम आठचे संपूर्ण वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. 
 
शेवटच्या 16 सामन्यांच्या शेवटच्या दिवशी मोठे अपसेट पाहायला मिळाले. 2010 चा चॅम्पियन स्पेन मोरोक्कोकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाद झाला. त्याचबरोबर जर्मनी आणि बेल्जियमसारखे बडे संघ ग्रुप स्टेजमध्येच पराभूत होऊन बाहेर पडले. 
 
फ्रान्स, ब्राझील, पोर्तुगाल आणि इंग्लंड यांसारखे मोठे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत आणि आता ते विजेतेपदाच्या प्रतिस्पर्ध्यात आहेत. उपांत्यपूर्व सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
 
FIFA विश्वचषक 2022 उपांत्यपूर्व फेरीचे पूर्ण वेळापत्रक-
क्रोएशिया विरुद्ध ब्राझील, 9 डिसेंबर, शुक्रवार, रात्री 8:30 , एज्युकेशन सिटी स्टेडियम
नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना, 10 डिसेंबर, शनिवार,रात्री 12:30   लुसेल स्टेडियम, 
पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को, 10 डिसेंबर, शनिवार ,रात्री 8:30 , अल थुमामा स्टेडियम
इंग्लंड विरुद्ध फ्रान्स, 11 डिसेंबर, रविवार, रात्री  12:30 , अल बायत स्टेडियममध्ये
 
उपांत्यपूर्व फेरीतील इंग्लंड विरुद्ध फ्रान्स यांच्यात सर्वात रोमांचक सामना होणार आहे. त्याचवेळी अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात निकराची लढत होऊ शकते. पोर्तुगालने शेवटच्या 16 सामन्यातील सर्वात मोठा विजय मिळवला. रोनाल्डोच्या संघाने स्वित्झर्लंडचा 6-1 असा पराभव केला. हा संघ आता मोरोक्कोविरुद्ध खेळेल, जो सततच्या चढ-उतारातून इथपर्यंत पोहोचला आहे. मोरोक्कोने स्पेनला विश्वचषकातून बाद केले आहे.
 
शेवटच्या 16 सामन्यांचे निकाल
नेदरलँड्सने  यूएसएला  3-1पराभूत केले 
अर्जेंटिनाने  ऑस्ट्रेलियाला  2-1 ने पराभूत केले 
फ्रान्सने  पोलंडला  3-1 ने पराभूत केले 
इंग्लंड ने  सेनेगलला  3-0 पराभूत केले 
क्रोएशियाने पेनल्टी वर जपानला  3-1 ने पराभूत केले 
ब्राझीलने दक्षिण कोरियाला  4-1 ने पराभूत केले 
मोरोक्को पेनल्टी वर स्पेनला पराभूत केले 
पोर्तुगालने स्वित्झर्लंडला 6-1 ने पराभूत केले 
 
स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने 14 आणि 15 डिसेंबर रोजी होतील तर अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होईल.
 
Edited by - Priya Dixit