रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By wd|
Last Updated :पुणे , मंगळवार, 8 सप्टेंबर 2015 (16:10 IST)

गणेशोत्सवाची आज सांगता

गेले दहा दिवस राज्यात सुरू असणार्‍या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता सोमवारी भव्य मिरवणुकीने होणार आहे. पुणे शहरातील मुख्य मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता मंडईमधून सुरु होणार आहे. याखेरीज उपनगरात स्वतंत्र मिरवणुका निघणार आहेत. मिरवणुकीसाठी शहर आणि परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. राज्याच्या विविध भागात मिरवणुका सुरळीत पार पडवत यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरातील मुख्य मिरवणूक वेळेत संपावी यासाठी मानाची मंडळे, तसेच पोलीस यंत्रणा आणि नागरिक प्रयत्नशील आहेत. दरवर्षी मिरवणूक संपण्यास 28 किंवा त्यापेक्षा अधिक तासाचा कालावधी लागतो, हे लक्षात घेता. यावर्षी मिरवणूक वेळेत संपावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्य रस्त्याखेरीज अन्य चार मार्ग मिरवणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.