सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (17:05 IST)

शास्त्रोक्त पद्धतीने 20 मिनिटात करा गणपती विसर्जन पूजा

भाद्रपद महिन्यातील गणेश चुतर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते. आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. गणरायाला योग्यरीत्या निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
 
गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्याचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे.
 
विधी: पूजा करण्‍यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.
 
दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा करावी.
 
पूजन साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत ठेवाव्यात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवावेत. पूजेसाठी शुद्ध पाणी एका ताब्यांत भरून ठेवावे.
 
पूजा प्रारंभ
पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करा. प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना दिलेली आहे.
दीपक पूजन: दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा. दिवा लावल्यानंतर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
(नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा.)
मंत्र: 'हे दीप देवा! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित रहावे.'
(हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)
 
खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: स्वाहा....(हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडा)
 
पवित्रीकरण
पवित्रीकरण पूजेसाठी खालील मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपव‍ित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करणाने पावित्र्य प्राप्त करू शकतो.'
'भगवान पुंडरीक्षा मला पावित्र्य प्रदान कर.'
 
श्री गणेशाचे ध्यान
ध्यान मंत्र: (प्रणाम करून म्हणा) सृष्टीच्या सुरवातीच्या काळात जे प्रकट झाले ते आज जगाचे परमकारण आहे. गणपती चार भुजाधारी आहे, गजवदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहेत, त्याला केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्याला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत.
 
त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो कुणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्या व्यक्तीला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! तुला प्रणाम करतो.
 
स्नान, पंचामृत स्नान:
विधी: पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला क्रमश: स्नानिय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
मंत्र:
स्नान समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगाजलाने तुला स्नान घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर'.
पंचामृत स्नान: (पंचामृतापासून स्नान)
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरेनेयुक्त पंचामृताने तुला आंघोळ घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर.'
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी समाविष्ट आहेत. तू स्नानासाठी हे जलग्रहण कर.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा.
 
वस्त्र किंवा उपवस्त्र:
वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित करा.
मंत्र:
1. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणार्‍या 'हे देवा! हे वस्त्र तुझ्या सेवेत अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे.
2. 'हे प्रभू! विविध प्रकारची चित्रे, नक्षीकामाने सुशोभित असलेले हे वस्त्र तुला अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे'.
महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.
 
गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा.
मंत्र:- 'हे देवा! सुखदायक, सुंदर आणि सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदूर शुभ्र आणि इच्छापूर्ती करणारा आहे. तुझ्या सेवेत तो सादर करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!
(दुर्वा अर्पण करा)
'हे प्रभु! जाईजुईची सुगंधित फुले किंवा त्यांच्या माळा तुझी पुजा करण्यासाठी आणल्या आहेत. तू त्याचा स्वीकार कर!'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार करतो.
(वरील मंत्र म्हणून गंध, फुले किंवा फुलमाळा, शेंदूर व विविध सुगंध, अंजीर, दुर्वांकुर, गुलाल इत्यादी अर्पण करा)
 
सुगंधित धूप:
उदबत्ती लावून देवापुढे ओवाळा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप 'हे प्रभू! तुझ्या सेवशी समर्पित आहे. तू त्याचा स्वीकार कर.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा. (वरील मंत्र बोलून धूप सगळीकडे पसरवा)
 
दीप दर्शन:
यासाठी एक वेगळा दिवा लावला जातो. दिवा लावल्यानंतर हात धुऊन खालील मंत्र म्हणा.
मंत्र: 'हे देवा! कापसाच्या वातीपासून प्रज्वलित दिवा तुझ्या सेवेत अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा! मी तुला हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! तू मला नरक यातनापासून वाचव. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा कर.'
 
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपती्च्या दिशेने प्रज्वलित करा) (नंतर हात धुऊन घ्या)
 
नैवेद्य दाखवा: 
गणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत.
देवाला नैवद्य अर्पण करण्यापूर्वी दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवद्याचे अमृत होऊ दे. ‍त्यानंतर खालील मंत्र म्हणून नैवद्य अर्पण करा.
 
मंत्र: 'हे देवा! श्रीखंड, दूध, दही, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!'
'हे देवा! तू हे नैवद्य ग्रहण करून तुझ्याप्रती माझ्या मनात असलेली भक्ती सार्थक कर. मला परलोकात शांती मिळू दे.'
(त्यानंतर खालील प्रत्येक मंत्र म्हणून पाणी सोडा)
1. ॐ प्राणाय स्वाहा
2. ॐ अपानाय स्वाहा
3. ॐ समानाय स्वाहा
4. ॐ उदानाय स्वाहा
5. ॐ व्यानाय स्वाहा