रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Updated : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (14:20 IST)

गणपतीपुळे: स्वंभू गणपती

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे.
 
सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्रामुळे हे मंदिर आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. एक किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.
 
गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच 2 किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे. हे स्थान रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.