किरण बेदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न
माजी आयपीएस अधिकारी आणि टीम अण्णाच्या सदस्या किरण बेदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले आहे. राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिल्याच्या दुसर्याच दिवशी किरण बेदी यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्याल्या मुख्यमंदीपदाची ऑफर मिळाली तरी त्यास आपली संमती असेल, असे किरण बेदी यांनी सांगितले.
दिल्ली नव्याने निवडणुका झाल्या तर भाजपतर्फे उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवाल काय? अशा प्रश्नाला उत्तर देताना किरण बेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दराम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले होते. आता हर्षवर्धन यांनी चांदणी चौक येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या तर किरण बेदी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.