सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (10:22 IST)

Goa Election 2022: भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, आणखी 6 नावे फायनल

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 40 जागांसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी भाजपने 6 नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. या यादीत एका महिला उमेदवाराचाही समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत 34 जणांची नावे निश्चित केली होती.
 
बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या नव्या यादीत भाजपने 6 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या नावांमध्ये राजेश तुळशीदास पाटणेकर, जोसेफ रॉबर्ट, अँटोनियो फर्नांडिस, जनिता पांडुरंग मेडकेलकर, नारायण जी नायक आणि अँटोनी बार्बोस यांचा समावेश आहे.
 
यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत 34 उमेदवारांची नावे निश्चित केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळीतून निवडणूक लढवणार आहेत. गोवा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचे नाव या नावांमध्ये नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 14 फेब्रुवारी रोजी गोव्यातील 40 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.