शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (20:33 IST)

गुरू म्हणजे नितळ पाणी ...

गुरू म्हणजे नितळ पाणी असें,
डोकावता त्यात स्वच्छ प्रतिबिंब दिसे,
नाही विकत घेता येत, "त्यांच्या"प्रती श्रद्धा!
अंतरी असावा लागतो ओलावा,अन विश्वास सदा!
फिरून यावे गुरू सवे, दुनियेत त्यांच्या,
मगच ओळख पटते "त्यांची"आंत मनाच्या,
नाही मग सुटत गाठी ह्या बद्ध झालेल्या,
न होतं विचलित मनही,कितीही कथा ऐकल्या,
जडतो केवळ परम विश्वास, अन प्रेम त्यांच्यावरी,
गुरुविण 'मोक्ष"न मिळे हाच विश्वास जडे अंतरी!
हात जोडा प्रेमभरे, झुकवा शिश घ्या नमते!
गुरू ची शक्ती च अशी की, भवसागरा पार करते!
.....अश्विनी थत्ते