शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (17:14 IST)

Hanuman jayanti 2023 हनुमान जयंतीला 12 राशींच्या जातकांनी लाभ मिळवण्यासाठी अशा प्रकारे पूजा करावी

Hanuman
देशभरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्री रामाचे परम भक्त हनुमानजी यांचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला. हा दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. काही लोक या दिवसाला हनुमान जयंती म्हणण्याच्या बाजूने नाहीत, त्यांच्या मते जन्मोत्सव हा शब्द वापरला पाहिजे कारण श्री हनुमानजीं चिरंजीवी आहेत.
 
वेबदुनिया आपल्या वाचकांच्या धार्मिक भावनांचा आदर करतं तर चला जाणून घेऊया 12 राशींनुसार हनुमानाची पूजा कशी करावी
 
मेष राशी : एकमुखी हनुमंत कवच पाठ करावा आणि हनुमानाला बूंदीचा नैवेद्य दाखवून गरीब मुलांमध्ये वाटून द्यावा.
 
वृष राशी : रामचरितमानसच्या सुंदर-कांडचा पाठ करावा आणि हनुमानाला गोड रोट अर्पित करुन माकडांना खाऊ घालावे.
 
मिथुन राशी : रामचरितमानसच्या अरण्य-काण्डचा पाठ करावा आणि हनुमानाला विडा अर्पित करुन गायीला खाऊ घालावा.
 
कर्क राशी : पंचमुखी हनुमंत कवच पाठ करवा आणि हनुमानाला पिवळे फुलं अर्पित करुन पाण्यात प्रवाहित करावे.
 
सिंह राशी : रामचरितमानसच्या बाल-कांडचा पाठ करवा आणि हनुमानाला गुळाची पोळीचा नैवेद्य दाखवून भिकाऱ्याला द्यावी.
 
कन्या राशी : रामचरितमानसच्या लंका-कांडचा पाठ करावा आणि हनुमान मंदिरात शुद्ध तुपाचे 6 दिवे लावावे.
 
तूळ राशी : रामचरितमानसच्या बाल-कांडचा पाठ करावा आणि हनुमानाला खीर अर्पित करुन गरीब मुलांमध्ये वाटावी.
 
वृश्चिक राशी : हनुमान अष्टक पाठ करावा आणि हनुमानाला गुळाचा भात अर्पित करुन गायीला खाऊ घालावा.
 
धनू राशी : रामचरितमानसच्या अयोध्या-कांडचा पाठ करावा आणि हनुमानाला मध अर्पित करुन प्रसाद स्वरुपात ग्रहण करावे.
 
मकर राशी : रामचरितमानसच्या किष्किन्धा-कांडचा पाठ करावा आणि हनुमानाला मसूर डाळ अर्पित करुन मासोळ्यांना टाकावी.
 
कुंभ राशी : रामचरितमानसच्या उत्तर-कांडचा पाठ करावा आणि हनुमानाला गोड पोळ्या अर्पित करुन म्हशींना खाऊ घालाव्या.
 
मीन राशी : हनुमंत बाहुक पाठ करावा आणि हनुमान मंदिरात लाल रंगाचा ध्वज किंवा पताका अर्पण करा.