शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

एकदा देवी पार्वती महादेवासोबत संतसंग करत होत्या. तेव्हा देवीने महादेवाला विचारले, गृहस्थ लोकांचे कल्याण कसे होऊ शकते? तेव्हा महादेवाने सांगितले की त्या गृहस्थावर देव, ऋषी आणि महर्षी प्रसन्न राहतात ज्याच्यात हे गुण असतात.....
1. खरे बोलणे
2. सर्व प्राण्यांवर दया करणे
3. मन आणि भावनांवर संयम ठेवणे
4. सामर्थ्याप्रमाणे सेवा- परोपकार करणे
5. आई-वडील आणि वृद्ध लोकांची सेवा करणे

6. शील व सदाचाराने संपन्न राहणे
7. अतिथींची सेवा करणे
8. क्षमाशील राहणे
9. धर्मपूर्वक धन कमाई करणे
10. दुसर्‍यांच्या संपत्तीवर लोभ न करणे


पुढे वाचा.. काय म्हणाले महादेव

11. परस्त्रीला वासनेच्या दृष्टीने न बघणे
12. कोणाचीही निंदा- चुगली न करणे
13. सर्वांप्रती मैत्री आणि दया भाव ठेवणे
14. सौम्य वाणी बोलणे
15. स्वेच्छाचारापासून दूर राहणे
 
ज्याच्यात हे सर्व गुण असतात तो व्यक्ती सुखी गृहस्थ असून र्स्वग गाठतो.