थोर महिमा लाभला अक्षय त्रितीयेला
साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त हा,
अक्षय फळ, आपल्यास देणार हा,
करा दान पुण्य आजचेच दिवशी,
होतें लक्ष्मी प्रसन्न, वाढे संपत्ती दिसामासी,
आजचे दिनी माँ अन्नपूर्णेचा जन्म झालासे,
गंगा पृथ्वीवर आज प्रकट होऊनी वाहतसे,
महाभारत रचिले व्यासांनी आजदिनी,
पितृऋण फेडतात ,लोकं आज आनंदानी,
असा थोर महिमा लाभला अक्षय त्रितीयेला,
करा मंडळी साजरा त्यास, जपा आपल्या परंपरेला.
....अश्विनी थत्ते