सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (08:32 IST)

मारुती स्तोत्र पाठ आणि पठनाचे फायदे

मारुती स्तोत्र 17 व्या शतकातील महान संत रामदास स्वामी यांनी रचले आहे. मारुती स्तोत्रात हनुमानजींबद्दल सांगितले आहेत. नियमितपणे मारुती स्तोत्राचे पठण केल्याने त्या व्यक्तीवर हनुमानजींची विशेष कृपा राहते.
 
भीमरूपी महारुद्र स्तोत्राला मारुती स्तोत्र देखील म्हणतात आणि या स्तोत्राच्या सुरुवातीला 13 श्लोकांमध्ये हनुमानजींची स्तुती करण्यात आली आहे. शेवटचे 4 श्लोक वाचले तर त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हालाच समजेल. 
 
तसे याचे पठण करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की - 
1. भूत आणि रोगांपासून मुक्ती मिळते. 
2. संपत्तीत वाढ होते. 
3. वंशामध्ये वाढ होते. 
4. काळजीतून मुक्ती मिळते.
5. असे अनेक फायदे आहेत ज्यामुळे ग्रह दोष दूर होतात.
 
Bhimrupi Maharudra Lyrics:
 
भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती |
वानरी अंजनीसुता रामदूता प्रभंजना ||१||
 
महाबली प्राणदाता सकलां उठावी बलें |
सौख्यकारी दुखहारी दूत वैष्णव गायका ||२||
 
दिननाथा हरिरुपा सुंदरा जगदान्तरा |
पातालदेवताहन्ता भव्यसिंदूर लेपणा ||३||
 
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथ पुरातना |
पुन्यवंता पुन्यशिला, पावणा पारितोषिका ||४||
 
ध्वजांगे उचली बाहो आवेशें लोटला पुढे |
कालाग्नी कालरुद्राग्नी देखतां कापती भएँ ||५||
 
ब्रह्मांडे माइली नेडों, आंवले दंत्पंगति |
नेत्राग्नि चालिल्या ज्वाला भ्रुकुटी ताठिल्या बलें ||६||
 
पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुण्डले बरीं |
सुवर्ण कटी कन्सोटी घंटा किंकिणी नागरा ||७||
 
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातलू |
चपलांग पाहतां मोठे महाविद्धुल्लतेपरी ||८||
 
कोटीच्या कोटि उद्धाने झेपावे उतरेकडे |
मन्द्राद्रीसारिखा द्रोनू क्रोधे उत्पाटीला बलें ||९||
 
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगति |
मनासी टाकिलें मांगे गतिसी तुलणा नसे ||१०||
 
अणुपासोनि ब्रह्मंडाएवढा होत जातसे |
तयासी तुलणा कोठे मेरु मंदार धाकूटे ||११||
 
ब्रह्मंडा भोवते वेढे, वज्र पुच्छे करू शके |
तयासी तुलणा कैची, ब्राहमडी पाहता नसे ||१२||
 
आरक्त देखिले डोला ग्रासिले सूर्य मंडला |
वाढतां-२ वाढे भेदिले शुन्यमंडला ||१३||
 
धन-धान्य पशूवृद्धि, पुत्र-पौत्र संग्रही |
पावती रूप विद्द्यादी स्तोत्र पाठे करुनिया ||१४||
 
भूतप्रेत सम्नधादी, रोग-व्याधि समस्तही |
नासति टूटती चिंता आनन्दे भिमदर्शने ||१५||
 
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभाली बरी |
दृढ़देहो निसंदेहो संख्या चन्द्रकला गुणे ||१६||
 
रामदासी अग्रगन्यु, कपिकुलासी मंदणु |
अंतरात्मा दर्शने दोष नासती ||१७||