शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या आयूचे सुख प्राप्त करत असतील. महाभारतात वर्णित एका प्रसंगाप्रमाणे राजा धृतराष्ट्र महात्मा विदुर यांना विचारतात की व्यक्तीची आयू कमी होण्याचे काय कारणं आहेत?
तेव्हा विदुर म्हणतात-
 
* नेहमी स्वत:चे कौतुक करणारा, स्वत:ला समजदार समजणारा व्यक्ती गर्विष्ठ असतो. स्वत:ला श्रेष्ठ आणि दुसर्‍यांना लहान समजणार्‍या व्यक्तीचा गर्व त्याची आयू कमी करतं.
 
* अधिक आणि व्यर्थ बोलणारा व्यक्ती अनेकदा असे काही बोलून जातो ज्यामुळे भविष्यात त्याचे नकारात्मक परिणाम झेलावे लागतात. म्हणून अधिक शब्दांचे प्रयोग न करता वाणी संयमित ठेवावी कारण असंयमित वाणीने आयू कमी होते.
 
* क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागात केलेल्या कामांमुळे त्याला दुख आणि नुकसान झेलावं लागतं. या प्रकाराच्या सवयींमुळे व्यक्तीची आयू कमी होते.

* समाजात सुख आणि शांतीने जीवन व्यतीत करण्यासाठी व्यक्तीमध्ये त्याग आणि समर्पण भाव असला पाहिजे. ज्या लोकांमध्ये त्यागाची भावना नसते त्यांची शीघ्र मृत्यू निश्चित आहे.
 
* शास्त्रांप्रमाणे आपल्या फायद्यासाठी मित्र आणि नातेवाइकांना धोका देणे महापाप मानले आहे. धोका देणार्‍या व्यक्तीची आयू कमी असते.
 
* लोभ आणि स्वार्थाला व्यक्तीचे शत्रू मानले गेले आहे. जी व्यक्ती मनात ही भावना बाळगतात, त्यांची आयू लांब असणे शक्य नाही. लोभी माणूस अधिक दिवस जिवंत राहत नाही.