सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (12:35 IST)

गजानना तुझ्यामुळे...

बुलढाण्यातिल एक गाव..
नाव त्याचे आहे शेगावं..
तेथे बसला लोकांचा भाव..
गजानना तुझ्यामुळे..... 
 
वातावरण मस्त.. 
काय ती शिस्त..
तुमच्यावर भिस्त..
गजानना तुझ्यामुळे..... 
 
काय ती सुंदरता ..
काय ती नम्रता..
काय ती स्वच्छता..
गजानना तुझ्यामुळे.....
 
हजारो भक्त येती..
रांगेत दर्शन घेती.. महाप्रसादाचे सेवन करती..
गजानना तुझ्यामुळे.....
 
पळते दु:ख..
मिळते सु:ख..
रांगेत लोकं..
गजानना तुझ्यामुळे....
 
तुच माझे मन ..
तुच माझे  धन..
अनुभुतिचे क्षण..
गजानना तुझ्यामुळे....
 
जय श्री गजानन