मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मारुतीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय

कलियुगात हनुमान असे देव आहे जे सर्वात लवकर प्रसन्न होतात. यांच्या कृपेमुळे सर्व त्रास दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते. येथे आपण जाणून घेऊ मारुतीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय... हे सर्व उपाय एखाद्या श्रेष्ठ मुहूर्तात करायला पाहिजे  ...
1. सकाळी स्नानादी करून एखाद्या मारुतीच्या देवळात जायचे. मंदिरात पोहोचल्यानंतर पंचोपचारद्वारे हनुमानाची पूजा करायला पाहिजे. पूजेत लाल चंदन, लाल फूल, अक्षत वाहून धूप व दिवा लावायला पाहिजे.  
2. हनुमानाला चमेलीच्या तेलासोबत शेंदुराचा चोला आणि लाल वस्त्र अर्पित केले पाहिजे.  
3. हनुमान चालीसाचा पाठ करावा किंवा श्रीराम नामाचा जप करावा.  
4. हनुमान मंत्र ऊँ रामदूताय नम:चा जप 108 वेळा करा. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळांचा वापर करावा.  
5. हनुमानाला गूळ-चण्याचा प्रसाद अर्पित करावा. कणीक व गुळाचे पदार्थ मारुतीला प्रसाद म्हणून अर्पित करावे.  
6. पंचमुखी हनुमानाचे दर्शन करावे आणि नारळ अर्पित करावे. त्यानंतर त्याच्या चरणातील शेंदूर आपल्या मस्तकावर लावावे.  
 
एखाद्या शुभ मुहूर्तात हनुमानाच्या देवळात जायला पाहिजे आणि आपल्या सोबत एक नारळ घेऊन जायचे. मंदिरात मारुतीची प्रतिमेसमोर नारळाने आपल्या डोक्यावर सातवेळा ओवाळायचे. त्यासोबत हनुमान चालीसाचा जप करत राहावा. नंतर नारळ हनुमानासमोर फोडावे. हे उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.  
 
दिव्याचा उपाय
रात्री एखाद्या मारुतीच्या देवळात जायचे आणि तेथे प्रतिमेसमोर चारमुखी दिवा लावावा. दिव्यात वाती अशा प्रकारा लावायला पाहिजे की दिवा चारीबाजूने लावू शकतो. हनुमान चालीसाचा पाठ करावा.  
 
हे ही लक्षात ठेवा  
मारुतीच्या पूजेत स्वच्छता ठेवणे फारच गरजेचे आहे. येथे देण्यात आलेले उपाय करताना व्यक्तीने शरीर आणि मनाची पवित्रता बनवून ठेवणे फारच जरूरी आहे. आई वडील आणि वृद्धजनांचा सन्मान करावा. जेव्हा कधी मंदिरात जाल तेव्हा गरजूला इच्छांनुसार द्रव्यदान करावे.