1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (11:10 IST)

कार्य सिद्धी यंत्र, याने दारिद्र्य येत नाही

हे कार्यसिद्धी यंत्र जवळ असल्यास दारिद्र्य येत नाही. घरात सुख, समृद्धी, शांती, नांदते. प्राचीन काळापासून हे यंत्र वापरण्यात येत आहे. प्राचीन काळी राजे, महाराजे, सरदार, हे यंत्र स्वतः जवळ बाळगत असत. हे यंत्र जाड तांब्याचा पत्र्यावर उठवले असत. 
 
हे वर्तुळाकार असून सात भागात विभक्त केले आहे. प्रत्येक विभागात एक आकृती आहे व त्याच भागात काही सांकेतिक आकडे आहे. वीणा (९१), सर्प (३८), नाव (३३), बाण (५२), तारा (६१), हिरा (१७), व झाड (४७), हे यंत्र आपल्या पूजेत ठेवावे. 
 
दर रोज या यंत्राची पूजा करावी. घरातून बाहेर पडताना ह्या यंत्रांस निरक्षून बघावे. कार्यसिद्धी निश्चित होते. हे यंत्र संकटापासून पण रक्षण करतं.