शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सोमवारी हे करा, कष्ट दूर होतील, प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल

सोमवार म्हणजे महादेवाची आराधना करण्याचा वार... प्रत्येक कामासाठी सोमवार शुभ मानला गेला आहे. या दिवशी दिवशी ते पश्चिम दिशेत प्रवास केल्याने यश मिळतं. तसेच सोमवारी असे काही सोपे धार्मिक कार्य केले जाऊ शकतात ज्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश हाती लागेल..
 
या दिवशी महादेवाला दूध किंवा पाण्याने अभिषेक करावे.
मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक कष्ट सहन करावा लागत असेल तर कुलदेवतेची पूजा करावी.
यथाशक्ती तांदूळ, दूध, चांदी दान करू शकता.
चंद्रमा कष्टकारी असल्यास नदीत चांदी वाहल्याने सर्व कष्ट दूर होतील.
या दिवशी खीरचे सेवन करणेही शुभ असतं.
चंद्रमा नीच असल्यास व्यक्तीने पांढरे कपडे घालावे आणि पांढर्‍या चंदनाचा टिका लावावा.
मनात काही इच्छा असेल तर दोन मोती किंवा दोन चांदी चे एकसमान तुकडे घ्यावे त्यातून एक पाण्यात वाहून द्या. याने इच्छित कामना पूर्ण होईल. दुसरा तुकडा स्वत:जवळ ठेवावा.
चंद्रमा कष्ट देत असल्यास रात्री दूध किंवा पाण्याने भरलेले भांड आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे आणि दुसर्‍यादिवशी सकाळी पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना मनोभावे नमस्कार करावा.
एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ज्यांच्या कुंडलीत चंद्रमा षष्ठ भावात असेल त्यांनी दूध दान करू नये. द्वादश भावात असेल तर साधू संन्यासी लोकांना भोजन करवू नये.