1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (21:23 IST)

संत अमृतराय संपूर्ण माहिती

vitthal
महाराष्ट्रात अनेक संत आहेत त्यापैकी मराठवाड्यातील संत अमृतराय हे एक नाव प्रख्यात आहे. नावाप्रमाणे त्यांचे काव्य देखील अमृताप्रमाणेच आहे. आपल्या काव्यातून हरिकीर्तनचा अमृतवर्षाव होतो. अमृतराय यांचा जन्म अमृतेश्वर महादेवांच्या कृपेने झाल्यामुळे त्यांचे नाव अमृत ठेवले. त्यांचा जन्म 17 मार्च इ.स. 1698 शके 1620 चैत्र शुद्ध षष्ठी रोजी साखरखेर्डा जिल्हा बुलडाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शंकर तर आईचे नाव उमा असे.त्यांचे शिक्षण घरीच झाले. बाल्यावस्थापासूनच त्यांना ईश्वराची भक्ती लागली वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी ईश्वराला कटिबंध रचना अर्पण केली. वडिलांसह त्यांना अनेक ठिकाणाचे प्रवास घडले त्यात ते अनेक संतना भेटले त्यामुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.त्यांनी श्री अंबिका सरस्वती यांच्या कडून वेदांत, स्मृती, शास्त्र पुराणे भागवत यांचे धडे घेतले.   

त्यांचा विवाह औरंगाबाद(संभाजीनगर) येथील विठ्ठलराज यांची कन्या रमा यांच्याशी झाला.त्यांच्या आईवडिलांना एकाच दिवशी एकाच वेळी समाधी झाली. त्यांनतर घराची जबाबदारी म्हणून औरंगाबाद येथे विसोमोरे यांच्याकडे खजिनदाराचे काम पाहू लागले. औरंगाबाद येथे स्थायिक झाले. ते मराठी, हिंदी, संस्कृत, फारशी कानडी भाषेचे ज्ञाता होते. त्यांची राहणी वैभवाची होती.    
ते फार कमी वेळातच कुशाग्र बुद्धीमत्ता, अंगात असणारे विविध गुण आणि विनोदी स्वभाव तसेच जन्ममात कवित्व शक्ती यामुळे अमृतरायजी अल्पावधीतच लोकप्रिय झाले.रायजींनी आपला काव्य प्रवाह वाढवला आणि लोकांना हवे असणारे कटाव, आग्रहाने, पदे, चुर्णिका असे निरनिराळे काव्य प्रकार देउन लोकांची भगवत्भक्तिकडे ओढ निर्माण केली.आपले काव्य बहुजन समाजापर्यंत पोहोचावे यासाठी मराठी, हिंदी, फारशी, उर्दू, संस्कृत, कानडी इ.भाषेमधून काव्य रचना केली. आणि लोकांना भक्ती प्रेमाचा व ज्ञानाचा बहुमोल असा ठेवा दिला.

त्यांची काव्य रचना संस्कृत प्रचूर असून प्रासादिक आहे. व ती तेजस्वी अशा गुणांनी नटलेली आहे.अमृतराय व त्यांचे गुरू मध्वनाथ यांनी त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून काव्य रचना केली आणि मराठी सारस्वताचे एक मनोरम दृश्य निर्माण केले.मृतरायांना मध्वमुनींनी ईश्वरभजनाकडे वळविले. तेव्हा त्यांनी आपल्या अमृत वाणीचा उपयोग करून सुरस आख्याने व सुंदर पदे रचण्यासाठी केला.मराठी, हिंदी, फारशी, उर्दू, संस्कृत आदी भाषांवर प्रभुत्व. महाराजांनी चैत्र शुद्ध षष्ठी, इ.स. 1753, शके 1775 ला पैठण येथे गोदावरी तिरी चक्रतीर्थावर जलसमाधी घेतली. त्यांनी ज्या दिवशी जलसमाधी घेतली त्या तिथीला अमृतषष्ठी किंवा कपिलाषष्ठी म्हणतात.   

Edited By- Priya Dixit