लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, शंकराची आरती मराठी अर्थासह

Last Updated: रविवार, 12 जून 2022 (18:15 IST)
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
हे शंकरा तुझा जयजयकार असो!

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस...

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे, तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे...

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥
देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले...
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली...

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या...

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या...
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो "श्रीराम जय राम जय जय राम " हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या...

रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो!


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे ...

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय
सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे.या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्यास सर्व ...

महाभारतातील हे सात धडे आत्मसात केल्याने जीवनात कभी पराभव ...

महाभारतातील हे सात धडे आत्मसात केल्याने जीवनात कभी पराभव होणार नाही
महाभारताची शिकवण सर्व काळात प्रासंगिक राहिली आहे. महाभारत वाचल्यानंतर त्यातून मिळालेली ...

संत निवृत्तीनाथ अभंग गाथा (एकूण २१८)

संत निवृत्तीनाथ अभंग गाथा (एकूण २१८)
निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी ...

संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी

संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी
निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव, ...

Shani Dev Story शनीची मूर्ती काळी कां, रहस्य सांगणारी कथा

Shani Dev Story शनीची मूर्ती काळी कां, रहस्य सांगणारी कथा
स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...