गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (11:25 IST)

विनायक चतुर्थी : हे उपाय दूर करतील विघ्न

प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात.
 
विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं. तुमच्या कोणत्याही मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल देवाचे आशीर्वादाला वरद असे म्हणतात. जी भक्त भगवान गणेशासाठी विनायक चतुर्थीला संयमाने व्रत करतात अशा भक्तांना गणपती भरभरुन आशीर्वाद देतात. ज्ञान आणि धैर्य हे असे दोन नैतिक गुण आहेत आणि ज्या व्यक्तीमध्ये हे गुण आहेत तो आयुष्यात बरीच प्रगती करतो आणि इच्छित परिणाम मिळवितो. या दिवशी या निश्चित उपाययोजना केल्या गेल्या तर घरातील त्रास दूर होतात. घरात समृद्धी येते. धन-संपत्तीत वाढ होते. चला या उपायांबद्दल जाणून घ्या.
 
विनायक चतुर्थीच्या दिवशी स्फटिकापासून तयार गणेशाच्या मूर्तीची पूजा केल्यास घरातले सर्व वास्तू दोष दूर होतात.
 
विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला चांदीचा चौरस तुकडा अर्पण केल्याने मालमत्तेचे विवाद मिटविले जातात.
 
या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा, पिंपळ किंवा कडुलिंबाने निर्मित गणेशाची मूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जा येते.
 
विनायक चतुर्थीला गणपतीला शतावरी अर्पण केल्याने मानसिक वेदना दूर होतात आणि जीवनात शांतता येते.
 
विनायक चतुर्थीच्या दिवशी श्वेतार्क गणेश मूर्तीची पूजा करावी. असे मानले जाते की असे केल्याने घरात संपत्ती आणि आनंदात वाढ होते.
 
विनायक चतुर्थीला शेणापासून बनवलेल्या गणेश जीची मूर्ती बसवून त्याची पूजा करावी. या उपायाने घराचे वातावरण शुद्ध व शांत राहतं. घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी देखील या प्रकारे उपासना करणे फायदेशीर आहे.
 
विनायक चतुर्थीच्या दिवशी हळदीने तयार गणेशाची मूर्ती अत्यंत शुभ आणि सुखदायक मानली जाते. यामुळे घरात आनंद प्राप्ती होते. घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये बंधुता आणि प्रेम वाढतं.