शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Dev Deepawali हे उपाय केल्याने दूर होतील संकट

दीपदान
या दिवशी दीप दान करणे पुण्याचे काम मानले गेले आहे. मान्यता आहे की या दिवशी केलेले पुण्य कार्य आणि दान वर्षभर गंगा जल सेवन करण्याइतकं फलदायी आहे. म्हणूनच येथे पुण्य कार्य केल्याने सुख-समृद्धी नांदते.
 
कवड्या 
या दिवशी 11 कवड्या घेऊन हळद लावून पैसे ठेवत असलेल्या जागी ठेवावे. देवी लक्ष्मीला स्थायित्व देण्याचा हा उपाय आपल्या घरात धनाची कमी भासू देणार नाही.
 
आंब्याच्या पानांचा तोरण 
या दिवशी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. तसेच घरात सुख-समृद्धीचा वास राहतो. लक्ष्मी देवीला तोरण अत्यंत प्रिय आहे.
 
मोहरीच्या तेलाचा दिवा
देव दीपावलीच्या दिवशी शनी देवाची पूजा करावी. या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने आपण आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर मात करु शकतात.
 
तुळशीसमोर दिवा
संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात समृद्धी येईल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
 
उडीद डाळ आणि तांदुळाचे दान 
या दिवशी गरिबांना उडीद डाळ आणि तांदूळ दान करणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने घरात धान्याची कमी भासणार नाही.