बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (12:13 IST)

काय सांगता घरात महाभारत ठेवल्याने भांडण होतात ?

वडील धाऱ्यांकडून ऐकत आलो आहोत की घरात महाभारत ठेवू नये किंवा त्याचे पठण देखील करू नये कारण यामुळे घरात भांडण होतात. ही समजूत खरी आहे की नाही चला या संदर्भात खास गोष्टी जाणून घेउया..
 
1 चार वेदांनंतर पाचवे वेद महाभारत मानले गेले आहे. म्हणजे ह्याला वेदांसम स्थान मिळाले आहे. जेव्हा वेद आपण घरात ठेवू शकतो तर हे देखील ठेवू शकतो कारण वेदांमध्ये महाभारताच्या युद्धासारखेच दशराज्ञ आणि इंद्र - वृत्तासुराचे वर्णन मिळत. दशराज्ञ किंवा दशराजाच्या युद्धात परस्पर कुळाच्या लढण्याचे वर्णन मिळतात.
 
2 बऱ्याचश्या घरात दुर्गा सप्तशती, रामायण, पुराण किंवा इतर ग्रंथ आढळतात. सर्व ग्रंथांमध्ये युद्धाचे वर्णन आढळतं, तर युद्धाचे वर्णन केल्यामुळे हे घरात ठेवणे योग्य नसल्याची समजूत चूक आहे. 
 
3 एखाद्याचा असा विश्वास असेल की हे घरात ठेवल्याने नाते संबंध कमी होतात तर रामायणात देखील नाते संबंध आहेत. आपण हे विचार करू शकता की यामुळे आपले वैवाहिक जीवन खराब होऊ शकत आणि आपल्याला देखील अरण्यात राहावं लागणार. घरात अश्या बऱ्याच कादंबऱ्या असतील ज्यामध्ये नात्याबद्दल बरंच काही लिहिलेले  असणार. जगातील प्रत्येक शास्त्रात नातं आणि युद्धाला घेउन बरेच काही लिहिले आहे.
 
4 प्राचीन काळात प्रत्येक घरात महाभारताचे ग्रंथ असायचे पण मध्ययुगीन काळात महाभारत घरात ठेउ नये अशी कल्पना कशी पसरली किंवा पसरवली गेली. हे कोणास ठाऊक नव्हे. ही अफवा जी आता सत्यात बदलली आहे. गुलामगिरीच्या काळात हिंदूंना त्यांच्या धर्म ग्रंथ, भाषा आणि संस्कृतीपासून दूर करण्याचे प्रचार व प्रसार झाले आहेत त्यामधील एक म्हणजे हे की महाभारताला घरात ठेउ नये आणि रामायण तर खोटं आहे. 
 
5 महाभारतात वेद, पुराण, उपनिषद, भारतीय इतिहास आणि हिंदूंचे संपूर्ण ग्रंथाचे सार आणि निष्कर्ष आढळतात म्हणून या ग्रंथाचं घरात असणं फार महत्वाचं आहे कारण निव्वळ ह्याला वाचून आणि समजूनच साऱ्या ग्रंथाला आणि इतिहासाला वाचलं आणि समजलं जातं.
 
6 महाभारतात न्याय, अन्याय, नातं आणि जीवनाशी निगडित सर्व समस्यांचे वर्णन सापडतं. हे ग्रंथ माणसाला हुशार आणि समजूतदार बनवून समाज आणि राजकारणात देखील हुशार करतं. म्हणून प्रत्येक माणसाला या ग्रंथाचा अभ्यास करून या मधील लिहिलेल्या सूत्रांना समजले पाहिजे जे जीवनात फार कामी येतात.
 
7 जो मूल लहानपणीच महाभारताचा अभ्यास करून घेतो तो मोठा होऊन खूप हुशार बनतो, कारण जे ज्ञान आपण आपल्या आयुष्यभराच्या अनुभवाने शिकतो तेच ज्ञान महाभारतात लिहिले आहे. जे आधीपासूनच मिळाले आहे की आयुष्यात कधी काय होईल ह्याचे ज्ञान आधीच मिळून जातं. अश्या परिस्थितीत हे ज्ञान माणसाला जीवनाच्या मार्गावर व्यवस्थितरीत्या पुढे वाढण्यास मदत करतं. रामायण जीवनात काय करावं या वर जास्त भर देते आणि महाभारत जीवनात काय करू नये या वर जास्त भर देते, म्हणून घरामध्ये दोन्ही ग्रंथ असणे आणि ते आपल्या पाल्याला शिकवणं जास्त गरजेचं आहे.
 
8 महाभारतात श्रीकृष्णाच्या गीतेच्या ज्ञानाशिवाय इतरही अनेक प्रकारांच्या ज्ञानांचा समावेश आहे. जसे की पाराशर गीता, धृतराष्ट्र- संजय संवाद, विदुर नीती, भीष्म नीती, यक्ष प्रश्न इत्यादी.
 
9 हिंदूंच्या कोणत्याही ग्रंथात असे लिहिलेले नाही की महाभारताला घरात ठेवू नये. असं असत तर महर्षी वेदव्यासांनी हे स्पष्ट केलं नसतं का? ही पुस्तक जेथे जेथे ठेवली तिथे असं काहीही घडलं नाही. 
 
10 खरं तर हा एकमेव असा ग्रंथ आहे जे संपूर्ण हिंदू धर्म आणि त्याचा इतिहासाला दर्शवतो आणि धर्म, धोरण, ज्ञान, तर्कशास्त्र, राजकारण, मोक्ष, विद्या आणि सर्व कलांचे ज्ञान देऊन धर्म स्थापनेचे स्रोत स्पष्ट करतो. कोणी धर्म विरोधीच असा असेल जो हे इच्छितो की या ग्रंथाला हिंदू वाचू नये आणि घरात देखील ठेउ नये. जेणे करून हिंदू या ग्रंथापासून दूर होवो.