बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शनिवार, 21 एप्रिल 2018 (09:54 IST)

डीजे एविचीचे निधन

प्रसिद्ध स्वीडिश डीजे एविचीचे (२८) ओमानची राजधानी मस्कतमध्ये निधन झाले आहे. एविचीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याबद्दल समजू शकलेले नाही.
 
डीजे आणि रेकॉर्ड प्रोड्यूसर असलेल्या एविचीला लोक त्याच्या इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखतात. एविचीचे मूळ नाव टिम बर्जलिंग होते. एविचीला दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाला आहे. ‘वेक मी अप’,‘द डेज’आणि ‘यू मेक मी’ही एविचीची गाणी बरीच गाजली. एविचीचे ‘वेक मी अप’हे गाणे २०१३ साली ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. २०१३ साली आलेल्या True या डेब्यु अल्बमपासूनच एविचीने स्वत:हाची एक वेगळी ओळख निर्माण केली.