पाक नरमले ; लख्वीला पुन्हा ‘जाळ्यात’
पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसर्याच दिवशी २६/११ हल्यातील प्रमुख सुत्रधार रहमान लख्वीला जामीन मंजूर केल्याने जगभरातून नाचक्की झाल्याने पाकिस्तानने कोलांटीउडी घेत दुसºया एका प्रकरणात लख्वीला अटक केली आहे.
लख्वीला जामीन मंजूर झाल्यावर भारतासह विविध देशांतून तीव्र संताप व्यक्त केला होत. त्यामुळे विशेष न्यायालयाने दिलेल्या लख्वीच्या जामिनाच्या निकालाला लाहोर हायकोर्टात आव्हान देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
दरम्यान, लख्वीला जामीन मिळाला असला तरी सरकारच्या मेंटेनन्स आॅफ पब्लिक आॅर्डर या कायद्यानुसार त्याला जामीनावर सोडता येणार नाही, असं पाकिस्तानातील अधिकाºयांनी सांगितले आहे.