बुधवार, 20 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बगदादमध्ये बॉम्बस्फोट; 125 ठार

बगदाद- इराकची राजधानी बगदादमध्ये रमजाननिमित्त बाजारपेठ गजबजलेली असतानाच शनिवारी मध्यरात्री दोन भयंकर बॉम्बस्फोट घडवण्यात आले असून त्यात 125 जण ठार, तर 200 नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘आयसिस’ने ऑनलाइन स्टेटमेंटद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा आत्मघातकी हल्ला होता, असा दावाही संघटनेने केला आहे.
 
कर्राडा भागात झालेला स्फोट सर्वात भयंकर होता. ट्रक रेफ्रिजरेटरमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याचा स्फोट होऊन 125 जण ठार झाले तर याच स्फोटात 200 च्यावर लोक जखमी झाले. तर अल-शाब शहरात दुसरा स्फोट घडवण्यात आला. स्फोटानंतर अग्नितांडवकर्राडा हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. त्यातच सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने रात्री या भागात मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी होती. अचानक घडलेल्या स्फोटांनी एका क्षणात शहरातील चित्र पालटले. 
 
सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावर अग्नितांडव उसळल्याचेही दिसत आहे. रॉयटर्स टीव्हीने सकाळी घेतलेल्या फुटेजमध्ये किमान चार इमारतींचे नुकसान होऊन त्यांचा काही भाग कोसळल्याचेही दिसत आहे.