बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (16:14 IST)

हुक्का बारमध्ये 14 जणांवर गोळीबार

शनिवारी सकाळी अमेरिकेतील लास वेगास येथील हुक्का  बारमध्ये 14 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक पार्टी सुरू होती, त्यादरम्यान दोन लोकांमध्ये वाद झाला आणि त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला, यादरम्यान अनेकांना गोळ्या लागल्या.