बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (09:13 IST)

टेक्सासमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये 46 मृतदेह आढळले

अमेरिकेच्या टेक्सास राज्यात ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये 46 प्रवासी मृतावस्थेत सापडले आहेत. सॅन अँटोनियोच्या नैऋत्येस मृतदेहांनी भरलेला ट्रॅक्टर-ट्रेलर सापडला आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीनुसार, दक्षिण टेक्सासमध्ये स्थलांतरित तस्करीच्या वेळी हे लोक मारले गेल्याचे वृत्त दिले. 
 
एका स्थानिक वृत्तवाहिनीनुसार, मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाउनटाउन सॅन अँटोनियोच्या दक्षिणेकडील सीमेवरील दुर्गम भागात रेल्वे रुळांजवळ मृतदेह असलेले वाहन सापडले. सॅन अँटोनियो पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सॅन अँटोनियो येथील मेक्सिकन जनरल कॉन्सुलेटने सांगितले की कॉन्सुल जनरल रुबेन मिनुट्टी घटनास्थळी रवाना झाले आहेत. 
 
मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी सांगितले की, पीडितांचे राष्ट्रीयत्व अद्याप समजलेले नाही. एबार्ड यांनी ट्विट केले की, "टेक्सासमधील शोकांतिका. बंद ट्रेलरमध्ये गुदमरल्याने परप्रांतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मेक्सिकोचे वाणिज्य दूतावास घटनास्थळी रवाना झाला आहे. 
सेंट अँटोनियो टेक्ससमध्ये असून ते अमेरिका-मेक्सिको सीमेपासून 250 किमी अतंरावर आहे.
 
टेक्ससचे गव्हर्नर ग्रेग अबट यांनी घटनेची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना जिली आहे. 'सीमा सताड उघड्या ठेवण्याचे परिणाम' असं वर्णन त्यांनी केलं आहे.
 
मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबरार्ड म्हणाले, हे लोक अद्याप कोणच्या देशाचे आहेत हे माहिती नाही.
 
हे लोक कसे गेले हे अद्याप समजलेले नाही आणि पोलिसांनीही खुलासा केलेला नाही.सोमवारी या शहराचे तापमान 39.4 सेल्सियस इतके होते.