सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (22:25 IST)

अमरुल्ला सालेहने तालिबानला खुले आव्हान दिले, स्वतःला अफगाणिस्तानचा काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले

अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला देशाचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले आहे. मंगळवारी एका ट्वीटमध्ये सालेह म्हणाले  की, अफगाणिस्तानच्या घटनेनुसार, राष्ट्रपतींची अनुपस्थिती, पळून जाणे, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यास प्रथम उपराष्ट्रपती कार्यवाहक अध्यक्ष बनतात.मी सध्या माझ्या देशात आहे आणि कायदेशीर काळजीवाहू अध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि सहमतीसाठी संपर्क करत आहे. 
 
तालिबानला खुले आव्हान देताना ते म्हणाले की मी अजूनही देशात आहे.मी देशाला कधी ही तालिबानच्या अधिपत्यात जाऊ देणार नाही. पंजशीरचा परिसर अद्याप तालिबानच्या ताब्यात आलेला नाही. ते म्हणाले की, मी देशातील सर्व नेत्यांचा सल्ला घेत आहे.
 
दरम्यान, तालिबान उद्या सरकार स्थापनेचा दावा करू शकतो. तालिबान नेता मुल्ला बरादर दोहाहून कंधारला पोहोचला आहे.