शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

या शहरात बोलण्यावर मनाही

इंडोनेशियाच्या बाली येथे एक असे सण साजरं करण्याची परंपरा आहे ज्यात पूर्णपणे चूप आणि शांत बसावे लागतं. पूर्ण शहर या परंपरेत सामील असतं. याला 'न्येपी' असे म्हटले जातं. इंग्रजीत याला 'डे ऑफ साइलेंस'ही म्हणतात आणि बालीनीज कॅलेंडरप्रमाणे हे 'इसाकावरासा' अर्थात साकाचे नवीन वर्ष म्हणून साजरं केलं जातं. हे एक हिंदू सण आहे ज्याला बाली येथे साजरा करण्यात येत असून या‍दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. यादिवशी येथील लोकं ध्यान लावून बसतात आणि कुणाशीही बोलत नाही.
 
इमरजेंसी सेवा व्यतिरिक्त इतर परिवहन सेवा बंद असतात. काही लोक या दिवशी उपास करतात आणि संध्याकाळी 'ओमेद-ओमेदन' किंवा 'द किसिंग रिचुअल' परंपरा पार पडतात ज्यात ते एकमेकाच्या कपाळाचे चुंबन घेऊन शुभेच्छा देतात.
 
भारतात हे 'उगादी' म्हणून साजरं केलं जातं. न्येपीचा हा दिवस आत्म चिंतनासाठी आरक्षित आहे. या दिवशी मनोरंजनावरही प्रतिबंध असतो. कुणीही प्रवास करत नाही, आपसात बोलत नाही. रस्त्यावरही आवाज होत नाही. केवळ घराबाहेर सिक्योरिटी गार्ड्स असतात ज्यांना पिकालैंग म्हणतात ते सुनिश्चित करतात की लोकं बंदीचे पालन करत आहे की नाही.
 
ही परंपरा बाली येथे राहणार्‍या हिंदू लोकांद्वारे पाळली जाते. इतर धर्मावर हे प्रतिबंध लागू नाही. त्यांना काहीही कामं करण्याची सूट असते. तसेच न्येपीच्या दुसर्‍यादिवशी लोकं पुन्हा आपली दिनचर्या सुरू करतात. एकमेकांना शुभेच्छा देत समारंभात सामील होतात.