सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 नोव्हेंबर 2024 (10:47 IST)

Donald Trump: डोनाल्डट्रम्प यांनी सात स्विंग राज्य जिंकून इतिहास रचला

donald trump
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी काही ठिकाणी मतमोजणी सुरूच होती. ऍरिझोना देखील त्यापैकी एक होता. शनिवारी जाहीर झालेल्या निकालातही डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍरिझोना जिंकले. यासह डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत सर्व सात स्विंग राज्ये जिंकून इतिहास रचला.

याआधी2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ॲरिझोनामध्ये जो बिडेन यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅट पक्षाने विजय मिळवला होता, परंतु यावेळी ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाने या राज्यातील सर्व 11इलेक्टोरल मतांवर कब्जा केला. ट्रम्प 2016 च्या तुलनेत जास्त इलेक्टोरल मतांनी विजयी झाले.

ऍरिझोना राज्य रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. जो बिडेन हे 2020 मध्ये ऍरिझोना जिंकणारे गेल्या 70 वर्षांतील दुसरे डेमोक्रॅट नेते होते. आता 2024 मध्ये पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाला आपला बालेकिल्ला वाचवण्यात यश आले आहे. ट्रम्प यांच्यावर अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत, तरीही त्यांनी 2016 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 312 इलेक्टोरल मते मिळाली आहेत, जी व्हाईट हाऊससाठी शर्यत जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 270 पेक्षा कितीतरी जास्त आहेत.
 
जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन सारख्या स्विंग राज्यांसह 50 पैकी अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले

2024 च्या निवडणुकीत सात स्विंग राज्ये होती ज्यात पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, जॉर्जिया, विस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलिना, नेवाडा, ऍरिझोना यांचा समावेश होता. आता निवडणूक निकालात ट्रम्प यांचा सातही स्विंग राज्यांतील विजय ऐतिहासिक आहे.
Edited By - Priya Dixit