पाकिस्तानी मॉडेल म्हणते, 'हमारा कल्चर, हमारा मियाँ...'

SADAF SABZWARI
Last Modified मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:39 IST)
पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सदफ कंवल ही स्त्रीवादावर केलेल्या भाष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. पाकिस्तानात सोशल मीडियावर सदफ कंवलच्या बाजूने आणि विरोधात मोठ्या प्रमाणात मतं मांडताना दिसतायेत.
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात #OurHusbandOurCulture ट्रेंड होताना दिसतोय.

ARY या पाकिस्तानी चॅनेलवर अँकरनं सदफला विचारलं की, स्त्रीवादावर तुझे विचार काय आहेत? पाकिस्तानातील महिला पीडित आहेत?

या प्रश्नाचं उत्तर देताना सदफ म्हणाली, "महिला अजिबात पीडित नाहीत. महिला कणखर आहेत आणि मी स्वत:ही खूप कणखर आहे. किंबहुना, तुम्हीही कणखरच असाल. महिला 'बिचारी' नाहीये. महिलांवरील चर्चा पूर्णपणे वेगळी होईल. आपली संस्कृती काय आहे, पती आहे. मी लग्न केलंय. मला त्याच्या चपला पण उचलायच्या आहेत, त्याचे कपडेही इस्त्री करायचे आहेत, जे मी खरंतर करत नाही."
"मात्र, मला माहित असायला हवं की, माझ्या पतीचे कपडे कुठे आहेत. मला माहित असायला हवं की, माझ्या पतीची कुठली गोष्ट कुठे आहे. त्याला काय खायचंय, हेही मला माहित असायला हवं. कारण मी त्याची पत्नी आहे. कारण मी एक महिला आहे. त्यामुळे माझ्याबद्दल त्याला जास्त माहिती असायला नको, तर त्याची मला अधिक माहिती असायला हवी."

सदफ पुढे म्हणाली, "मी हेच पाहत मोठी झालीय. हल्ली खूप लिबरल्स आलेत. मला वाटतं की, स्त्रीवादात स्वत:च्या पतीची काळजी घ्यावी, आदर करावा आणि जे शक्य आहे ते करावं."
पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सदफच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोक विचारतायेत की, सदफला नक्की म्हणायचं काय आहे?

काही लोक असंही म्हणतायेत की, भारतातील महिला आणि पुरुषांची हॉकी टीम टोकियो ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली असताना, आपल्याकडे काय होतंय तर 'आपली संस्कृती, आपला पती' ट्रेंड होतंय. पाकिस्तानी पत्रकार शिराज हसन यांनी यांनी हे मत ट्विटरवरून व्यक्त केलंय.
लाहोरमधील वकील रीमा उमर यांनी सदफचा व्हीडिओ ट्वीट करून लिहिलंय, "हल्ली खूप लिबरल्स आलेत." यावर शाहरूख वानी नामक व्यक्तीनं लिहिलंय, "अशी संस्कृती जिथे पत्नी तिच्या पतीची काळजी एखाद्या लहान मुलासारखी घेते."
काही ट्विटर युजर्सनं विचारलंय की, पुरुषाला कामवाली हवी की पत्नी? अब्दुल्ला इमरान यांनी लहान मुलाच्या इमोजीच्या फोटोसह लिहिलंय, "सर्व पुरुष सदफ कंवलच्या मताशी समहत आहेत की, लग्नाचा अर्थ कामवाली घरात आणणं होय."

सोहेब नामक युजरनं लिहिलंय, "सदफ कंवल, तुमच्या पतीची नोकर बनून तुम्ही खुश आहात. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण मला नाही वाटत की, माझी मुलीने अशाप्रकारे विचार करावं."
पाकिस्तानी कॉमेडियन अली गुल पीर यांनी सदफच्या मुलाखतीचा ऑडिओ वापरून विनोदी व्हीडिओ तयार केलाय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

तर काही लोकांनी सदफचं समर्थनही केलंय. राना गुफरान नामक युजरनं लिहिलंय, "यात अडचण काय आहे? ती या उपखंडाच्या संस्कृतीबद्दल सांगतेय आणि तिचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. ज्या प्रकारे सदफची टर उडवली जातेय, त्यावरून लक्षात येतं की, लोकांना पुरुषांच्या अधिकारांप्रती काहीच आवडत नाही."
SADAF SABZWARI
या मुलाखतीत सदफचे पती शहरोज सुद्धा होते.
शहरोज यांनी म्हटलंय, "महिला जे करू शकतात, ते पुरुषही करू शकत नाहीत. दोघांनाही आपापली जागा समजली पाहिजे. अल्लाहने दोघांनाही वेगवेगळी भूमिका दिलीय. जर असं नसतं, तर अल्लाहने दोघांना वेगवेगळं बनवलंच नसतं. महिला आणि पुरुष वेगवेगळा विचार करतात. जर दोघांनीही एकमेकांचा आदर केला, तर तीच समानता असेल."यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Covid -19: तेलंगणाच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा ...

Covid -19: तेलंगणाच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा स्फोट, एकाच वेळी ४३ विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना लागण
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील बोमक्कल येथील आनंद राव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे ...

मुंबईत साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

मुंबईत साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
मुंबई- धारावी परिसरात एक हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेत झोका खेळत असताना 13 वर्षीय मुलीचा ...

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या
पुण्याच्या चंद्रभागा हॉटेल समोर दुचाकीवरून येऊन दोघांनी एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार ...

नागालँडची घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, 14 जणांच्या ...

नागालँडची घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, 14 जणांच्या मृत्यूचे प्रमुख कारण
नागालँडमध्ये 14 जणांच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ही घटना का आणि कशी घडली ...

अटारी सीमेवर पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला, नाव ठेवले ...

अटारी सीमेवर पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला, नाव ठेवले  'बॉर्डर'
अटारी सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून अडकलेल्या एका जोडप्याने 2 डिसेंबर रोजी मुलाला जन्म ...