1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:43 IST)

पाकिस्तानमध्ये महागाई, दुधाचा दर 180 रुपये

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. यात आता दुधाची भर पडली आहे. कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दुधाच्या दरात अचानक प्रति लीटर 23 रुपयांनी वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दुधाचा दर 180 रुपयांवर पोहोचला आहे. 
 
 'सरकारकडे वारंवार दूधाच्यादरात वाढ करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानं आम्ही स्वत:च दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला,' अशी माहिती कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दिली. 
 
चारा, इंधनासह अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचं कराची डेयरी फार्मर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यानं 'डॉन न्यूज'ला सांगितलं. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सरकारच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटलो. मात्र त्यांनी काहीच केलं नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.