बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (15:15 IST)

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी सलग सातवा खटला हरली

जॉन्सन अँड जॉन्सनची पावडर वापरल्याने कर्करोग होत असल्याचा दावा करत दाखल करण्यात आलेल्या खटल्यांपैकी सलग सातवा खटला ही कंपनी हरली आहे. एका दांपत्याने या पावडरच्या वापरामुळे कर्करोग झाल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या दांपत्याच्या बाजूने निकाल देत कंपनीला ७६० कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
 
न्यूजर्सी इथे राहणारे स्टीफन लेंजो यांना मेसोथेलियोमा हा आजार झाला आहे. हा एक प्रकारचा कर्करोगच असून तो शरीरातील पेशा, फुफ्फुसं, पोट, ह्रदय आणि अन्य भाग हळूहळू प्रभावित करीत जातो. आपण जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची पावडर गेली ३० वर्षं वापरत असून या पावडरमध्ये अॅसबेस्टॉस असल्यानं आपल्याला हा कर्करोग झाल्याचं लेंजो यांनी म्हटलं होतं. यावर कंपनीने दावा केला होता की त्यांच्या तळघरात असलेल्या पाईपमध्ये अॅसबेस्टॉस असून त्यांना त्याचाच त्रास झाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कंपनीच्या विरोधात आदेश देत लेंजो यांना ७६० कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत. कनिष्ठ न्यायालयाने ही भरपाईची रक्कम पूर्वी २४० कोटी इतकी ठरविली होती जी वरच्या न्यायालयाने वाढवून ३६० कोटी केली.