शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जुलै 2024 (15:40 IST)

इथिओपियामध्ये भूस्खलनामुळे लहान मुलांसह किमान 146 लोक मृत्युमुखी

इथिओपियामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. येथे पावसामुळे दुर्गम भागात झालेल्या भुस्खनलात लहान मुलांसह किमान 146 जण मृत्युमुखी झाले आहे. सदर माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले, दक्षिण इथियोपियातील केंचो शाचा गोजदी  जिल्ह्यात झालेल्या भुस्खनलात मृत्युमुखींनमध्ये मुलांचा आणि गर्भवती महिलांचा समावेश आहे. 

सोमवारी सकाळी झालेल्या भूस्खलनात बहुतेक लोक गाडले गेले होते कारण एक दिवसापूर्वी झालेल्या भूस्खलनानंतर बचाव कर्मचाऱ्यांनी पीडितांचा शोध घेतला होता. 

या ढिगाऱ्यातून पाच जणांना जिवंत काढण्यात यश मिळाले आहे. अशी काही लहान मुले आहेत ज्यांनी आपले संपूर्ण कुटुंबाला गमावले आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. 

इथिओपियामध्ये जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात भूस्खलन होण्याच्या घटना सामान्य आहेत. हा पावसाळा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Edited By- Priya Dixit