गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (10:54 IST)

Salman Rushdie: सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटरच्या सपोर्टवरून काढण्यात आले

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, हल्लेखोराने सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत ताजे अपडेट जारी करण्यात आले आहे. आता सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. आता ते बोलण्याच्या स्थितीत आहे.  
 
द सॅटॅनिक व्हर्सेसचे लेखक सलमान रश्दी यांना आता व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. खरं तर, शुक्रवारी ते न्यूयॉर्कमध्ये व्याख्यान सुरू करणार होते तेव्हा एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते पण आता त्यांचे सहकारी लेखक आतिश तासीर यांनी ट्विट केले की, सलमान रश्दी आता व्हेंटिलेटरवर नाहीत. तो बोलतोय. इतकंच नाही तर तो आता विनोदही करतोय.
 
न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना २४ वर्षीय तरुणाने चाकूने अनेक वेळा गंभीर जखमी केले. त्याच्या हातातील नसा फाटल्या होत्या,यकृत खराब झाले होते. शस्त्रक्रिया करताना सलमान रश्दी यांचा एक डोळा गमावण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. बुकर पारितोषिक विजेते सलमान रश्दी 'सॅटोनिक व्हर्सेस' लिहिल्यानंतर वादात आले.  
 
सलमान रश्दीच्या या पुस्तकावर भारतासह अनेक देशांमध्ये बंदी आहे. या पुस्तकामुळे प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप सलमान रश्दींवर करण्यात आला होता. 
सलमान रश्दी यांच्यावर 24 वर्षीय हादी मातर याने हल्ला केला होता. हल्लेखोर मूळचा लेबनॉनचा आहे