गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 27 डिसेंबर 2017 (09:40 IST)

मिसेस युनायटेड नेशन 2018 साठी श्रद्धा करणार देशाचे प्रतिनिधित्व

जमैका येथे होणाऱ्या मिसेस  युनायटेड नेशन 2018 नाशिकची कन्या श्रद्धा मोहन कासार कक्कड ही नाशिकची कन्या प्रतिनिधित्व करणार आहे. आजकाल स्त्रिया सर्वक्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत मग ते खेळाचे मैदान असो, राजकारण असो, व्यवसाय असो, समाजसेवा असो किंवा सौंदर्य स्पर्धा असो. श्रद्धा कासार कक्कड जिने देश विदेशातील अनेक सौंदर्य स्पर्धेतील पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. नाशिकच्या बीवायके कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेताना जिने सौंदर्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले होते .एका मुलीचे हे स्वप्न आव्हानांनी भरलेले होते परंतु श्रद्धा कक्कडने आपल्या द्रुढ संकल्पातून 2000 मध्ये मिस नाशिक  हा पुरस्कार मिळवला व दोन वर्षांनंतर पुण्याचाही पुरस्कार आपल्या नावावर केला आणि स्वतःला राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांसाठी तयार केले आणि 2017 मध्ये हे स्वप्नही सत्यात आले 7 नोव्हेंबर 2017 या दिवशी दिल्लीत  ऐजाय जोशी यानी आयोजित केला होत श्रद्धा कासार कक्कडला मिसेस इंडिया होम मेकर्स या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. आणि त्यानंतर श्रद्धा कक्कड यांची निवड जमैका येथे होणाऱ्या मिसेस युनायटेड नेशन्स स्पर्धेसाठी करण्यात आली जात त्या आशियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत .या स्पर्धेत जगातील सौंदर्यवती सहभागी होणार आहेत दा तीयारा  रितिका रामतरी स्टूडियो तून स्पर्धेकारिता प्रशिक्षण घेतले होते. श्रद्धा कक्कड यांना  समाजसेवेची ही  आवड आहे पुण्यातील अनाथ मुलांसोबत त्या आपला फावला वेळ घालवितात व त्यांना सर्वतोपरी मदत करीत असतात. श्रद्धा यांनी 2011 मध्ये पुण्याच्या देवेन  कक्कड यांची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. 3 वर्षाचा मुलगा आहे .