1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:25 IST)

घरी झोपलेल्या धाकट्या बहिणीला सहा वर्षाच्या मुलाने गोळ्या घातल्या, पालकांना अटक

अमेरिकेतून अनेकदा गोळीबाराच्या बातम्या येत असतात, पण ताजी घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. इंडियानापोलिसच्या ईशान्येकडील मानसी गावात मंगळवारी ही घटना घडली. अमेरिकेतील इंडियानापोलिस प्रांतातील मानसी शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सहा वर्षाच्या निष्पाप मुलाने खेळात चुकून घरात झोपलेल्या आपल्या पाच वर्षांच्या बहिणीच्या डोक्यात गोळी झाडली. तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कडक पावले उचलत पोलिसांनी पालकांना अटक केली आहे. जेकब ग्रेसन, 28, आणि त्यांची पत्नी, किम्बर्ली ग्रेसन, 27, यांना निष्काळजीपणाबद्दल अटक करण्यात आली आहे.
 
मुलांचे वडील जेकब ग्रेसन यांनी पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाने घरातील कपाटात ठेवलेली गोळ्यांनी भरलेली बंदूक काढून खेळ समजून माझ्या मुलीवर गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 
 
मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पालकांच्या बेडरूममध्ये कपाटाची चावी सापडली . कपाटाचे कुलूप उघडून त्यात ठेवलेली बंदूक काढून धाकट्या बहिणीवर गोळी झाडली. घटनेच्या वेळी आई झोपली होती. गोळीच्या आवाजाने ती जागी झाली तेव्हा तिच्या  डोळ्यांसमोरच मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने तिला धक्काच बसला.
 
मुलांची आई, किम्बर्ली ग्रेसन यांनी पोलिसांना सांगितले की ती आणि तिचा नवरा काही काळापूर्वी मुलाला बंदूक कशी वापरायची हे शिकवण्यासाठी शूटिंग रेंजवर घेऊन गेले होते. या मुलाने तिथे लोकांना गोळीबार करताना पाहिले आणि हा खेळ समजून घरात गोळ्या झाडल्या आणि बहिणीची हत्या केली.