शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (16:24 IST)

Statue of Equality :अमेरिकेत बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण 14 तारखेला

ambedkar jayanti
Statue of Equality : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा अनावरणासाठी सज्ज झाला आहे. 14 ऑक्टोबर रोजी मेरीलँडमध्ये याचे अनावरण होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
 
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण होणार आहे, जो भारताबाहेरील डॉ.बाबा साहेबांचा सर्वात मोठा पुतळा असेल. 14 ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.
 
प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी बाबासाहेबांचा पुतळा तयार केला असून तो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून ओळखला जाणार आहे. अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील अकोकिक शहरात 13 एकर जागेवर डॉ.आंबेडकरांचा 19 फुटी पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळ्याच्या उद्घाटनावेळी भारत-अमेरिकेसह जगभरातून आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने येतील, अशी आशा आयोजकांना आहे. समतेचा पुतळा बाबा साहेबांचे संदेश आणि शिकवण जगभर प्रदर्शित करण्यासाठी काम करेल.
 





Edited by - Priya Dixit