सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (11:00 IST)

महिलेने गायीशी लग्न केले, म्हणाली -नवऱ्याने दुसरा जन्म घेतला

एका महिलेने एका गायी सोबत लग्न केले .या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. महिलेच्या या निर्णयावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. कंबोडियाच्या क्राटी प्रांतात राहणारी  खिम हांग (74) अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
याचे कारण म्हणजे तिचे  लग्न. खिमने एका गायीशी लग्न केले आहे. 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महिलेच्या गायीसोबतच्या लग्नाचा कोणताही व्हिडिओ नाही, पण गावातील अनेक लोकांचा दावा आहे की त्यांनी हे लग्न पाहिलं आहे आणि त्यांनी त्यात हजेरीही लावली आहे.
खिमने गायीशी लग्न केले कारण तिचा असा विश्वास आहे की तिच्या मृत पतीने गाय म्हणून दुसरा जन्म घेतला आहे.
खिमला तिच्या मृत पतीचे सर्व गुण या गायीमध्ये जाणवतात. आता ही गाय खिमच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची सदस्य बनली आहे. तिचे संपूर्ण कुटुंब त्या गायीची सेवा करतात .
(प्रतिकात्मक चित्र)