बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (09:25 IST)

मोठा निर्णय, ट्रम्प यांचा H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. 24 जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. 
 
या आदेशाचा फटका अनेक भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनाही बसेल कारण भारतातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात. कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष 2021 साठी अमेरिकी सरकारकडून H-1B व्हिसा जारी करण्यात आले होते त्यांना याचा फटका बसणार आहे.
 
करोना संकटामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. अमेरिकेत वाढलेल्या बेरोजगारीमुळे अमेरिकी लोकांना प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.