गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (18:59 IST)

युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज देणार पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा

boris johnson
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती बीबीसीला मिळाली आहे. ते आता राजीनामा देणार असले तरी ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
 
जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला होता. नवनिर्वाचित अर्थमंत्री नादिम झाहवी यांनीही त्यांना राजीनामा देण्याची गळ घातली होती.
 
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरचं संकट क्षणोक्षणी गडद झाल्याचं पहायाला मिळालं. बोरिस यांनी गृहनिर्माण मंत्री मायकेल गोव्ह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आणि जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठीचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता.
 
बुधवारी (6 जुलै) गृहसचिव प्रीती पटेल यांनीसुद्धा पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्याची विनंती केली. त्यानंतर या घडामोडी झाल्या.
 
वेल्सचे परराष्ट्र मंत्री सिमन हार्ट हेसुद्धा या शिष्टमंडळात होते आणि त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला
 
अॅटर्नी जनरल सुएला ब्रेवरमन आणि माजी मंत्री मॅट हॅनॉक यांनीही पंतप्रधान जॉन्सन यांना राजीनामा देण्यास सांगितलं. ब्रेवरमन यांनी आपण नेतेपदाच्या स्पर्धेत राहण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं.
 
साजिद जावेद आणि ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यावर आतापर्यंत मंत्री आणि इतर अधिकारी अशा एकूण 44 जणांनी राजीनामा दिला आहे.
 
ख्रिस पिंचर यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे सर्व मंत्री जॉन्सन यांच्यावर नाराज आहेत. त्यातूनच हा वाद उफाळून आला आहे.
 
नाधीम झाहवी यांना काल अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्यात सांगितलं आहे. आपण पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत असं त्यांनी सांगितलं. झाहवी यांनीही जॉन्सन यांना राजीनामा देण्याची विनंती केली होती अशा बातम्या आल्या होत्या. नंतर या बातम्यात तथ्य नसल्याचं झाहवी यांनी सांगितलं.