शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

हाफिज सईदला तातडीने अटक करा : अमेरिका

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला तातडीने अटक करा, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला खडसावलं आहे. लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना शेकडो अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट यांनी म्हटलं आहे.
 
याआधी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सुटकेनंतर लाहोरमध्ये केक कापून हाफिजने सेलिब्रेशन केलं. यावेळी हाफिजचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.