सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Updated : बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:09 IST)

चेन्नई सुपरकिंग्ज संघातील गोलंदाजासह १२ सपोर्ट स्टाफला करोनाची लागण

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघातील (Support staff infected with coronary heart disease)एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंडिया टुटेने ही बातमी दिली आहे. करोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे. बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचं पालन करत होता. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत.
 
दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. परंतू संघातील सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर(Support staff infected with coronary heart disease) सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.
 
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली होती. “युरोपात फुटबॉल लिग स्पर्धा सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या क्षणांत काही खेळाडू करोना पॉझिटीव्ह (Support staff infected with coronary heart disease)आढळले होते. ८ संघ खेळाडू आणि इतर स्टाफ मिळून १ हजारापेक्षा जास्त लोकं भारतातून युएईत आली आहेत. कोणत्याही संघासोबत हा प्रकार घडणं अत्यंत स्वभाविक आहे. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही चेन्नईतील खेळाडू व इतर सदस्यांना अहवाल पॉझिटीव्ह येणं हे दुर्दैवी आहे. परंतू परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी सर्वतोपरीने काळती घेतली जात आहे.” सुत्रांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.