गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (07:29 IST)

सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत या 6 संघांमध्ये चुरशीची स्पर्धा, जाणून घ्या रँकिंग

राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम यांच्या आक्रमक खेळी आणि वेगवान गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. नटराजनच्या तीन आणि मलिकच्या दोन विकेट्सच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला 8 बाद 175 धावांवर रोखले.
 
प्रत्युत्तरात त्रिपाठीने 37 चेंडूत 71 आणि मार्करामने 36 चेंडूत नाबाद 68 धावा करत सनरायझर्सला सलग तिसरा विजय मिळवून दिला. सनरायझर्सने 13 चेंडू राखून सामना जिंकला. त्यांच्याकडे आता पाच सामन्यांत तीन विजय आहेत, तर केकेआरचा सहा सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे.
 
हैदराबादने आज चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला हरवून पॉइंट टेबलमध्ये 6 गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत संघ सातव्या स्थानावर असेल, पण सलग तीन सामने जिंकून त्यांनी दाखवून दिले आहे की या मोसमात त्यांना हलक्यात घेण्याची चूक नाही.
 
खराब नेट रनरेटमुळे संघ सातव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत. संघ आपला पुढील सामना 17 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे.
 
गुजरात टायटन्सने 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर तर पंजाब किंग्ज तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैद्राबादच्या विजयामुळे 6 संघांचे आता एकूण 6 गुण झाले आहेत, अशा स्थितीत या संघांमध्ये पुढील स्पर्धेत जबरदस्त स्पर्धा होऊ शकते.