सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (23:39 IST)

DC vs RCB IPL 2022 : बेंगळुरूचा 16 धावांनी विजय, दिल्लीवर मात करून गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 16 धावांनी शानदार विजय नोंदवला. आयपीएलच्या 27व्या सामन्यात बंगळुरू संघाने 189 धावांचा यशस्वी बचाव केला. बंगळुरूच्या संघाचा या हंगामतील हा चौथा विजय असून ते आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील IPL 2022 चा 27 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 173 धावाच करू शकला. दिल्लीकडून पृथ्वी शॉने 16 धावा केल्या. वॉर्नर 66 धावांवर बाद झाला. मिचेल मार्शने 24 चेंडूत 14 धावा केल्या. पॉवेल खातेही न उघडता बाद झाला. 
 
दिनेश कार्तिकने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. कार्तिक आणि अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी 52 चेंडूत97 धावांची भागीदारी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकातच अनुज रावत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली 12 धावांवर धावबाद झाला. प्रभुदेसाई 6 धावांवर बाद झाला. त्याचवेळी मॅक्सवेलने 34 चेंडूत 55 धावा केल्या.
 
सर्फराज खानच्या जागी मिचेल मार्शला दिल्ली संघात स्थान मिळाले आहे. तर हर्षल पटेलचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पुनरागमन झाले आहे. आकाशदीपच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबीने सलग तीन विजयांसह आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती, परंतु मागील सामन्यात चेन्नईने त्यांचा 23 धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, दिल्लीने मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध 44 धावांनी मोठा विजय नोंदवल्यानंतर मनोबल वाढवत या सामन्यात प्रवेश केला आहे.