रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (08:49 IST)

IPL सट्यावर धाड; वर्ध्यात 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

betting
वर्धा  : वर्ध्यातील सालोड शिवारात फार्म हाऊसवर सुरू ऑनलाइन सट्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जुगाऱ्याना रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख केवळ तीन हजाराची रोख रक्कम जप्त केली असून मुद्देमाल 26 लाखाचा जप्त केला आहे.
 
वर्धा जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सट्टाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यातच युवापिढी सट्यात वेढले जात आहे.उन्हाळ्यात दिवसात क्रिकेट खेळ खेळला जातो. या खेळावर क्रिकेट बुकीचे दुकाने थाटले जाते. आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर ,सेलू ,पुलगाव, वर्धा शहरात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा सट्टा खेळला जातो.सध्या सालोड शिवारात एका फार्म हाऊस वर सुरू असलेल्या ऑनलाइन सट्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत अशोक भगवंत ढोबाळे रा.पुलगाव, गिरीश नामदेव क्षीरसागर रा.चंद्रपूर, होमेश्वर वसंत ठमेकर रा.रामनगर, प्रवेश पुडीलाल चिलेवार रा.नाचणगाव , दिनेश नागदिवे रा. दयालनागर, अविन प्रवीण गेडाम रा.पुलगाव असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नावे पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईने अनेक क्रिकेट बुकीचे धाबे दणाणले आहे.
 
जिल्ह्यात आयपीएल ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामने सुरू आहे. यावरच सट्टा व्यवसाय जोमात सुरू आहे.सध्या रॉयल चॅलेंजेस बंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स ,मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल, राजस्थान रॉयल, सनराईज हैद्राबाद, चेन्नई सुपरर्किंग, गुजरात टायटल लखनऊ सुपर जंट्स तसेच इतर संघ खेळला जातो. या सामन्यावरच कोण जिंकणार कोण हारणार यावर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टा लावण्यात येते.यातच सालोड शिवारात होमेश्वर ठमेकर यांचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर दोन महिन्यांपासून आयपीएल सट्टा बाजार लावण्याचा प्रकार सुरू होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता पोलिसांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला.या छाप्यात सहा जुगारी मोबाईल अँपच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना रंगेहात मिळून आले.
 
26 लाखाचा मुद्देमाल जप्त
 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जुगाऱ्याना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून टीव्ही 3 संच, 36 मोबाईल, 3 रेकॉर्डर, 1 डोंगल, 2 लॅपटॉप, 1 इन्व्हर्टर, 1 चारचाकी वाहन, 3 दुचाकी, डायरीसह केवळ 3 हजाराची रोख जप्त केली असून 26 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पोलिसांच्या कारवाईत केवळ तीन हजाराची रोख
 
करोडो रुपयाचा क्रिकेट सट्टा खेळला जातो. यात करोडो रुपयाची लागवड केली जाते. त्यात केवळ 3 हजाराची रोख मिळाल्याने पोलिसांच्या कारवाईवर आता प्रश्न निर्माण झाले आहे.